दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड :- नांदेड पेटवडज एसटी महामंडळाच्या बसमध्ये १२५ प्रवासी उभे राहून प्रवास करत आहेत या मार्गावर खाजगी वाहने किंवा दुसरी एसटी बस चालू नसल्यामुळे प्रवाशांना अतिशय नाहक त्रास सहन करावा लागतो आहे जिल्हाच्या ठिकाणी जाण्यासाठी पेठवडज ते नांदेड या मार्गावर एकच बस असल्यामुळे दवाखाना, शासकीय कामासाठी जात असताना प्रवाशांना अतोनात त्रास होत आहे तेंव्हा एस. टी. महामंडळ मुखेड आगाराने याची चौकशी करून दुसरी गाडी सोडून सहकार्य करावे असे जनतेतून बोलले जात आहे.तसेच नवीन बस सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. गाडीत एकुण १२५ प्रवासी कोंबून जनावरांसारखे प्रवास करावा लागतो आहे. तेंव्हा आमदार डॉ. तुषार राठोड यांनी मुखेड आगारातून नवीन बस सेवा उपलब्ध करून देण्याची विनंती नागरिकांनी केली आहे.