दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा तालुक्यातील ऐतिहासिक नगरी हेलस विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी बालासाहेब रावसाहेब खराबे यांची तर व्हॉइस चेअरमनपदी सौ. सुवर्णा पांडुरंग खराबे यांची बिनविरोध निवड झाली तसेच मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी प्रल्हादराव बोराडे व प्राचार्य सचिन राठोड यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष निळकंठ वायाळ यांनी सत्कार केला यावेळी संचालक प्रकाश घुले तुकाराम बोंडारे पंढरीनाथ हेलसकर सदाशिव खराबे बाबासाहेब खराबे सौ मीना सचिन बोराडे कल्याणराव पवार सह सरपंच नामदेव बनसोडे उपसरपंच सोपान खराबे ज्ञानदेव खराबे राजेभाऊ खरराबे संस्थेचे सचिव अली कुरेशी निवडणूक निर्वाचन अधिकारी प्रसाद घुगे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.