दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:दिनांक 2 मे 2023 रोजी देगलूर तालुक्यातील बागन टाकळी ग्रामपंचायत निर्वाचित सदस्य असून गावच्या ग्रामपंचायतची सदस्य संख्या सात (7) असून यापैकी सहा (6) सदस्य सरपंच सौ.सुरेखा विश्वनाथ सोनकांबळे यांच्या कार्यप्रणाली व पतीराज वर्तनूकिला कंटाळून त्यांच्या विरूध्द पंचायतीच्या सभेत अविश्वासाच्या ठराव मांडूले. अविश्वास ठरावाची ग्रामपंचायत कार्यालय बागन टाकळी येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
अविश्वास ठरावाची कारणे. पुढील प्रमाणे
* गावचा कारभार करीत असताना सरपंच हे मनमानी वागतात व कुठल्याही सदस्यांना विश्वासात घेत नाहीत. प्रश्न विचारल्यास ते
* गावातील कुठल्याही सामन्य नागरीकांनी एखाद्या विषयावर सरपंचाना त्याला अरेरावी करत पतिराज धमकावून उद्धटपणे बोलतात.
*ग्राम पंचायतीचा निधी विकास कामासाठी खर्च करीत नाहीत. *सरपंच (महिला) यांची वर्तणूक ग्रामपंचायत महिला सदस्याची योग्य रितीची नसून त्यांचे
पतीराज “तूम्हाला काय कळते, तूम्ही कधीपासून शहाणे झालात असे बोलतात. सरपंच ग्रामसभा व मासिक सभेसाठी सदस्यांना विश्वसात घेत नाहीत आणि ठरावाची
अंमलबजावणी करीत नाहीत.
गावातील कोणत्याही योजनासाठी किंवा प्रमाणपत्र सरपंच यांचे कडून हवे असल्यास ते देण्यास टाळाटाळ करतात.
गटविकास अधिकारी देगलूर यांच्याकडे सामान्य नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील त्यांनी तक्रारीची दखल घेत नाहीत. यामुळे गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी देगलूर तहसीलचे तहसीलदार व बिडियो यांना सरपंचाबद्दल अविश्वास ठराव दिला त्यावेळी गावातील ग्रामपंचायत चे सर्व सदस्य प्रतिष्ठ नागरिक व गावातील सर्व नागरिक ग्रामपंचायत मध्ये उपस्थित होते.