दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर ता. देगलूर जि. नांदेड येथील रा.प. म. आगारात नविन बसेस उपलब्ध करुन देण्यात यावे असे निवेदन देण्यात आले.
जनहितार्थ निवेदन सादर करण्यात येते की, देगलूर ता. देगलूर जि. नांदेड हे शहर तेलंगणा, कर्णाटक, महाराष्ट्र या तिन्ही राज्याच्या सिमेवर वसलेले आहे. व या तालुक्याची लोकसंख्या 2 ते 250 लाख आहे. पंरतू रा.प. महामंडळाकडे त्याप्रमाणात बसेस उपलब्ध नाहीत. त्यामुळे मोठ-मोठया शहरामध्ये जाण्या योग्य बसेस नाहीत व दोन ते तीन शहरासाठी बसेस जातात. आज स्थित देगलूर आगारात फक्त 55 बसेस उपलब्ध असून त्यापैकी 10 बसेस सतत मेंन्टन्सवर असतात त्यामुळे देगलूर तालुक्यातील नागरीकांना खाजगी व कर्णाटक गाडयाचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये रा.प.म. वर असंतोष पसरला आहे.
तसेच देगलूर शहरात दोन बसस्टॅन्ड असून तेथे सुविधाचा अभाव आहे. रोडवर संडास चे पाणी वाहते.व आजू-बाजूस केर कचरा, दुर्गंधीने पसरलेले आहे. व जुना बसस्टँन्ड येथे प्रवाश्यांना बसन्याची, पाण्याची व्यवस्था उपलब्ध नाही. पुर्ण परिसर चिखलाने व दुर्गंधी पसरलेला आहे.
तरी मा. साहेबांना विनंती की, देगलूर शहरातील दोन्ही बसस्टॅन्डची प्रत्यक्ष पाहणी करुन योग्य ती कार्यवाही करुन नविन बसेस उपलब्ध करुन दयावी ही नम्र विनंती करण्यात आली. त्यावेळी सर्व शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते