दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- उस्माननगर येथून जवळच असलेल्या तपोवन बुध्दभुमी गोळेगाव ( प.उ. ) ता.लोहा येथे बुद्ध जयंती सोहळ्या निमित्त महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध मूर्ती लोकार्पण सोहळा दि.५ मे २०२३ रोज रोज शुक्रवारी आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९ : ३० वाजता पुज्य भिक्खु बोधिधम्मो,भन्ते चंद्रमणी,भंन्ते मेत्ताधम्मो व भिक्खु संघाच्या हस्ते बुद्धमूर्ती लोकार्पण सोहळा होणार आहे.
या प्रसंगी दुपारी १२ : ०० वाजता पुज्य भिक्खु बोधिधम्मो( तपोवन बुद्धभुमी गोळेगाव) यांची धम्मदेशाना होईल. धम्मदेसना झाल्यानंतर लगेच भोजनाचे आयोजनदान करण्याचे आयोजन केले आहे . तरी परिसरातील सर्व बौद्ध उपासक – उपासीका तसेच आंबेडकर अनुयायी यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन सध्दम्मातील उपासक, उपासीका ,भारतीय बौद्ध महासभा शाखा गोळेगाव व समस्त गावकरी मंडळी यांनी आव्हान केले आहे .