दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
गंगाखेड: तालुक्यातील धारासुर येथील राज्य संरक्षित गुप्तेश्वर मंदिराच्या
जिर्णोद्धार कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिकऱ्यांकडून मिळाली असल्याची माहिती गुप्तेश्वर मंदिर बचाव संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
यासाठी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरुवात होण्यापूर्वी महादेव मंदिरात असलेल्या शिवलिंग व नंदी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण होईपर्यंत विधी अभिषेक करुन दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करून स्थापन करण्यासाठी 2 एप्रिल 2023 मंगळवार रोजी गुप्तेश्वर मंदिर येथे बैठक संपन्न झाली.
त्यावेळी गंगाखेड तहसील कार्यालयाच्या वतीने धारासुर सज्जाचे तलाठी खळीकर, वास्तु आयादी अभ्यासक सरोदे सर, केशवदेव जोशी, सरपंच राजेभाऊ गवळे,मंदिर समितीचे अध्यक्ष राजेभाऊ शिंदे यांच्यासह
गुप्तेश्वर मंदिर बचाव संघर्ष समितीचे सदस्य निवृत्ती कदम, बालासाहेब नेमाने, ज्ञानेश्वर कदम सर, गंगाधर अण्णा जाधव, कृष्णा कदम, राजेभाऊ कदम, राजाभाऊ जाधव, बालासाहेब निर्मळ, उद्धव साबळे, केलास साबळे, सुदामराव जाधव, नरहरी कदम, प्रभू मामा, तुकाराम बालासाहेब कदम यांच्यासह गावातील अन्य ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.