दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
महावितरण परिमंडळ नांदेड तर्फे कामगार दिनानिमित्त देण्यात येत असलेला २०२३ उत्कृष्ट यंत्रचालक (नांदेड ग्रामीण)हा महावितरणातील सन्मानाचा पुरस्कार 33 के.वी .उपकेंद्र लोहा येथील प्रधान यंत्रचालक रुपेश काशिनाथराव महाबळे यांना नांदेड येथील महावितरण परिमंडळ कार्यालयात येथील कार्यक्रमात पुरस्कार देऊनसन्मानित करण्यात आले.
महावितरणाने नेमून दिलेल्या कामानुसार उपकेंद्राची देखभाल करणे अचानक उद्भवणाऱ्या तांत्रिक स्वरूपाच्या समस्येचे निराकरण करणे, संभाव्य अपघात कार्य कौशल्याने टाळून आपले कर्तव्य पार पाडणे तसेच आपल्या कार्यामधील त्यांनी दाखवलेली कार्यतत्परता कर्तव्यदक्षता निष्ठा कार्याप्रती समर्पित भावना तसेच सर्व सहकाऱ्यांशी प्रेम आपुलकी व नम्रतेने वागणे याच कार्यामुळे त्यांना 1 मे कामगार दिनानिमित्त महावितरण नांदेड परिमंडळाकडून 2023 चा सन्मानाचा उत्कृष्ट यंत्रचालक हा पुरस्कार अनिल डोये (मुख्य अभियंता नांदेड परिमंडळ ), यांच्या हस्ते देण्यात आला. सदर कार्यक्रमास महेश वाघमारे (उपकार्यकारी अभियंता नांदेड) ,बागुल साहेब, पाटील साहेब , गुटूवार साहेब ,कालेवाड साहेब तसेच महावितरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सदरील पुरस्कार रुपेश महाबळे यांना मिळाल्याबद्दल त्यांना त्यांचे सहकारी मित्रपरिवार यांच्याकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.