दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड – गोविंद पवार
लोहा : – खडकमांजरी या छोट्याश्या गावात अर्जुन नरवाडेचे प्राथमिक (५ वी पर्यंत) शिक्षण पुर्ण झाले. यामध्ये प्राथमिक शिक्षण घेताना नागरगोजे सरांमुळे पाया पक्का झाला. पुढचे शिक्षण गावामध्ये नसल्यामुळे जवळच्या 5 km अंतरावर असलेल्या श्री संत मोतीराम महाराज माध्यमिक विद्यालय कारेगाव येते पायाने ये जा करत ६ आणि ७ पर्यंत शिक्षण घेतले. सेमी इंग्रजी माध्यम तेथे नसल्यामुळे पुढचे (१० वी पर्यंत) शिक्षण हे कै. विश्वनाथराव नळगे माध्यमिक विद्यालय येथुन पुर्ण केले. येथील सर्व शिक्षकांनी जिथे अभ्यास समजत नसल्याने ते सोप्या पद्धतीने समजाऊन सांगितले विशेषत चव्हाण सरांचे खूप मोलाचे अतिशय मार्गदर्शन लाभले नंतर पुढचे शिक्षण कुठे घ्यायचे हा प्रश्न मनात येत होता.आणि लहानपणापासून डॉक्टर होण्याचे स्वप्न मनात होते.त्यामुळे विचार केला की ११ विला बायो ग्रुप निवडायचा त्यासाठी बेस्ट कोचिंग हे नादेड येथे होते. घरची परिस्थिती आर्थिक परिस्तीती ही नाजूक होती . त्यात चांगली गोष्ट म्हणजे गावचे भुमिपुञ तसेच वडिलाचे मामा असलेले चौगुले सरांचे ट्युशन नांदेड होते (ते आता IIB मध्ये रुपांतर झाले आहे. तेव्हा त्यांच्याकडे गेल्यास त्यांनी त्यांच्या स्वतःच्या ट्युशन ला फीस माफ केली व तसेच बाकीचे ट्युशन पण त्यांनी मला स्वतः लाऊन दिले. सुरुवातील मला तेथे वातावरणात मिसळायला खूप कठीण होते.माझ्यासोबत खुप हुषार मुले होते काहीचे तर पहिलीपासून इंग्रजी मध्येच शिक्षण झाले होते .आणि कैलास नरवडेची इंग्रजी खूप कच्चे होती. त्यामुळं सुरवातीला वाटल की आपल्याला काही होणार . पण मनात जिद्द होती की अपलाला काहिकी करून डॉक्टर व्हायचे आहे. नंतर सरांना भेटलो माझ सर्व काही संगीलत त्यावर सर म्हंटले की तू मेहनत करत रहा तुझ कसे पण निवड होऊन जाईन. सर मला सतत मार्गदर्शन करत असत.तसेच तेथील सर्व शिक्षक विशेषतः भोसले सर,कुशवाह सर,देशमुख सर,राऊत मॅडम यांनी अभ्यासातील प्रत्येक शंका दूर करत गेले. कुठे मी खचून गेली असेल तर लगेच चौगुले सरांना भेटलो की ते मला मोटीवेट करत असत.मी पहिल्यांदा MH-CET परीक्षा दीली त्यातून ३ गुणाने माझा नंबर गेला. नंतर दुसऱ्या प्रयंतानाचा वेळी NEET ही परीक्षा लागू झाली.त्यात मला चांगल्याप्रकारे यश प्राप्त झाले आणि माझा नंबर MIMSR MEDICAL COLLEGE, LATUR येथे लागला. येथे लागल्यास चौगुले सरांनी आर्थिक मदत ही स्कॉलरशिप च्य्या रुपात दिली. तेथे मी प्रत्येक वर्षी च्या परीक्षेत चांगले गुण घेऊन पास झालो.आणि तसेच माझे काका म्हणजेच IIB NANDED चे संचालक दशरथ पाटील सर यांनी सुधा मला खूप मदत केली. आणि ज्यांच्या माझ्या यशामध्ये सिंहाचा वाटा असलेले माझे आजी-आजोबा आई-वडील, काका-काकु, आणि मामा … यांच्याशिवाय हे वैद्यकीय शिक्षण घेणे मला कधी हि शक्य झाले नसते.