दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
लोहा शहर व तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देऊन सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे लोहा येथील डॉ.याकुबखान उर्दू शाळेतील शिक्षक तथा महाराष्ट्र राज्य राजमान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरीभाऊ चव्हाण असुन आज दि.३१ मे रोजी ते सेवानिवृत्त होत असुन त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा.
लोहयाचे पहिले सरपंच, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन कै. यशवंतराव चव्हाण यांचे पुत्र असलेले हरीभाऊ चव्हाण हे लहानपणापासून अभ्यासात हुशार होते तसेच ते त्यांचे वडील लोहयाचे पहिले सरपंच यशवंतराव चव्हाण यांनी लोहा शहरांच्या विकासाचा पाया रोवला त्यांनी अनेक गोरगरिबांना मदत केली त्यांची कामे केली .
वडिलांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर होता वडीलांची प्रेरणा घेऊन हरीभाऊ चव्हाण शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सदा अग्रेसर राहिले.
हरीभाऊ यांचा जन्म लोहा येथील सधन कुटुंबात दि. २२– ०५ – १९६५ रोजी झाला.
आईचे नाव गंगाबाई यशवंतराव चव्हाण व वडीलांचे नाव यशवंतराव चव्हाण आहे.
यशवंतराव चव्हाण हे लोहयातील एक सधन शेतकरी व एक निष्कलंक चारित्र्य संपन्न राजकारणी होऊन गेले . ते लोहयाचे प्रथम सरपंच, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष आदी पदे त्यांनी भुषविले अनेक गोरगरिबांचे त्यांनी कामे केली.
त्यांच्या विचारांचा पगडा हरीभाऊ चव्हाण यांच्यावर आहे.
हरीभाऊ चव्हाण यांनी शालेय शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यांची शिक्षक म्हणून प्रथम नेमणूक दि. ०१-०१-१९९२ रोजी झाली. २६ जानेवारी १९९२ साली साक्षरता अभियान मध्ये संस्थेचे संस्थापक विठ्ठलराव पवार साहेब व कृ.भा. जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रीय सहभाग घेऊन रात्रीचे वर्ग घेऊन निरक्षर लोकांना साक्षर केले. नांदेडचे तात्कालीन जिल्हाधिकारी सुधीरकुमार गोयल यांनी त्यांचा सत्कार केला.
त्यानंतर ते दि.०१-०७-२००१ ला त्यांची डॉ. याकूबखान उर्दू प्राथमिक शाळा लोहा येथे बदली झाली. त्यांनी शिवछत्रपती शाळा व डॉ. याकुबखान उर्दू शाळेत अनेक विद्यार्थ्यांना घडविले . स्काऊट गाईडच्या मेळाव्यात ते अग्रभागी होते.
तसेच श्री संत गाडगे महाराज विद्यालयाचे तात्कालीन क्रिडा शिक्षक अशोक शेंडगे सर यांच्या सोबत मिळून क्रिडा स्पर्धा भरवल्या, मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन केले. अनेक खेळाडू निर्माण केले त्यातील अनेक खेळाडू हे पोलिस,एसआरपी , आर्मी मध्ये भरती झालेत.
तसेच हरीभाऊ चव्हाण सर यांनी महाराष्ट्र राज्य राजमान्य प्राथमिक खाजगी शिक्षण संस्थेचे अनेक वर्ष लोहा तालुकाध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कार्य केले त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची २०२२ -२३ कालावधीसाठी महाराष्ट्र राज्य राजमान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष केले .
तसेच त्यांनी खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यां प्रमाणे शालेय पोषण आहार मिळावा म्हणून आंदोलन केले व त्यांच्या या आंदोलनाला यश मिळून खाजगी अनुदानित शाळेना शालेय पोषण आहार योजना सुरू झाली.
हरीभाऊ चव्हाण सर यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीतच सामाजिक क्षेत्रात ही सक्रीय राहिलेत . त्यांनी लोहा न.पा.ची पहिली निवडणूक ही लढविली. तसेच ते लोहा येथील ते बालाजी, हनुमान मंदिर देवस्थान चे सचिव ही आहेत त्यांनी सर्व गावकऱ्यांना सोबत घेऊन अनेक सप्ताह,हरीनाम किर्तन , सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले.
तसेच त्यांनी सरस्वती पगारदार शिक्षक पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन म्हणून उत्कृष्ट पणे कार्य करीत आहे तसेच ते लोहा येथील लोकमान्य ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ लोहाचे कोषाध्यक्ष म्हणून ही कार्यरत आहेत.
तसेच त्यांनी १९९६-९७ ला युती शासनाच्या काळात लोहा तालुका समन्वय समितीचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली होती व येथे ही त्यांनी चांगली कामगिरी केली.
तसेच २०२० -२१ मध्ये कोरोना व लाॅकडाॅऊनच्या काळात हरीभाऊ मित्रमंडळाच्या वतीने उल्लेखनीय कार्य केले ११ दिवस १०० रुग्णांना मित्रमंडळाच्या सहायाने जेवणाची व डब्याची मोफत वाटप केले.
तसेच ते लोहा शहरात शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
लोहा येथील गणेश मंडळ, शिवजयंती, राजमाता जिजाऊ जयंती मध्ये सक्रीय सहभाग नोंदवितात .
आज दि. ३१ मे २०२३ रोजी ते ३१ वर्ष शैक्षणिक क्षेत्रातून एक उत्कृष्ट व आदर्श शिक्षक म्हणून ते डॉ. याकूबखान प्राथमिक शाळेतून ते नियत व वयोमानानुसारनुसार वयाच्या ५८ व्या वर्षी सेवानिवृत्त होत असुन ईश्वर त्यांना चांगले निरोगी आरोग्य देवो त्यांच्या हातून नेहमीच समाजसेवा घडो ते दिर्घोआयुष्यी होवो हीच सेवानिवृत्तीनिमत सदिच्छा.
विलास सावळे
पत्रकार लोहा