दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहा तालुकाध्यक्ष हंगामी रमेश माळी माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असुन मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काढण्याचा अधिकार त्यांना असा नाव न घेता लोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे हंगामी तालुकाध्यक्ष पदाची धुरा दिलेले असा उल्लेख करत रमेश माळी यांची घेतलेली भूमिका चुकीची आहे.मी गेली तीन चार वर्षापासून पक्षात सक्रिय असून लोहा शहरासह तालुक्यातील मालाकोली, चोंडी घोटका, लिंबोटी, आधी ठिकाणी पक्ष बांधणीचे काम मोठ्या उमेदीने करून तत्कालीन तालुकाध्यक्ष ना मोठे सहकार्य केले. आजही तुम्ही सदरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बूथप्रमुखांना संपर्क करून विचारू शकता प्रभाकर पवार यांनी कित्येक खेडेपाडे पिंजली, पक्ष बांधणी केली, बुथ कमिट्याची नियुक्ती केल्या. मी एक निष्ठावंत राष्ट्रवादीचा मानणारा कार्यकर्ता पदाधिकारी असून काल परवा पक्षात आलेल्या लोकांना नाव घेऊन मोठ करणार नाही. मी एक उच्चशिक्षित तरुण ज्यांनी देशाचे नेतृत्व केलं अशा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद चंद्रजी पवार साहेबांच्या विचाराने भारावून गेलेला, पक्षाच्या वरिष्ठां चे आदेश प्रमाण म्हणून पक्षाला मोठी ताकद दिलेला सामान्य पदाधिकारी कार्यकर्ता आहे. मला पक्षाची घटना माहीत असून, जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून यांच्या विचाराने समाजातील अठरापगड जाती धर्माला पूरक असे विचार जोपासणारा व तमाम सर्व धर्मीयांना सोबत घेऊन चालणारा एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे. माझा कोणताही अवैद्य धंदा व्यवसाय नसून मी शिक्षकी पेशातला एक इमानदार, प्रामाणिक, निष्ठावंत असल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर व वरिष्ठांना माहित आहे. माझ्यासोबत अजूनही माझे जुने सहकारी माझी पंचायत समिती सदस्य चांदणे, विलास चुडावकर,घोरबांडसह अन्य मंडळी सोबतीला असेल आम्ही सर्वजण मिळून पक्ष वाढीचे काम अजूनही करत आहोत.
मी लोहयात पक्षात अगोदर पासून असल्याने लोहा तालुकाध्यक्ष पदावर माझा दावा होता . रमेश माळी हे अनेक पक्ष फिरुन आता राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आले आहेत व ते येथे राहतील म्हणून भरवसा नाही .
मी तालुकाध्यक्ष पदाचा दावेदार असल्याने उपऱ्यांना तालुकाध्यक्ष केले हे योग्य नाही.
त्यामुळे मी भावनेच्या भरात सोशल मीडियावर पोस्ट टाकून माझी नाराजी व्यक्त केली होती.
मी राष्ट्रवादीतच आहे व राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच राहणार आहे.
जर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरीहर भोसीकर यांनी आमच्यात समन्वय केल्यास ही जमेल कुणी पक्षात राहत असेल पक्षवाढीसाठी आपण त्यांचे स्वागत करूत असे प्रभाकर पवार म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पंचायत समिती सदस्य माधव चांदणे उपस्थित होते.