दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर येथील भूमीपुत्र ॲड.चंद्रकांत शिवाजीराव जहागीरदार यांची स्नुषा सौ.प्रिया अंकुश जहागीरदार तानविडकर यांनी बीट्स पिलानी विद्यापीठात मेटल आॕर्गनिक फ्रेम वर्क अँड सेल्युलोज असेटेट बेस्ड मिक्स्ड मॕट्रीक्स मेम्ब्रास फॉर सीओटू सेप्रेशन फ्राॕम मॉडेल बायोगॕस अर्थात विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाद्वारे बायोगॕसची प्रत सुधारणे या विषयावर प्रबंध सादर केला. बीट्स पिलानी विद्यापीठाकडून त्यांना पीएच.डी.प्रदान करण्यात आली.
या यशाबद्दल ॲड.चंद्रकांत जहागीरदार,सौ.वर्षा जहागीरदार,श्रीदत्त तानविडकर,सौ.श्रद्धा तानविडकर,शा.शं.जहागीरदार, डॉ.विजय जहागीरदार,रत्नाकर अमिलकंठवार,यशवंत सुभेदार,सौ.अरूणा देशमुख,सौ.स्मिता देशमुख,अरुण जोशी जामकर,अनिरूद्ध सिरसाळकर,तसेच लाठकर देशमुख व जहागीरदार परिवाराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले व उस्माननगर येथील गाववासीयां कडून अभिनंदन करण्यात येत आहे.