दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:सद्या लग्नसराई सुरू असल्यामुळे सर्व स्तरातून धूमधडाका चालू आहे.परंतू या लग्न समारंभात देगलूर येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या वाहनांना लग्न सोहळ्यासाठी भाडे तत्वावर जाण्यासाठी अधिकार आहेत का ? शाळेसाठी चालणाऱ्या वाहनांवर शाळेचे नाव असताना त्यांना लग्न समारंभात उपस्थित राहण्याचा परवाना आहे का ? दुर्देवाने या वाहनांचा अपघात झाला तर याला जिम्मेदार कोण ? शाळेच्या नावावर चालणाऱ्या वाहनांना शाळेच्या नावाचा परवाना आहे का ? असेअनेक वाहने लग्नसमारंभात उपस्थित असल्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहे.
सद्याची परिस्थिती पाहता एकाच तारखेत अनेक लग्न असल्यामुळे वाहने मिळणे कठीण झाले असल्यामुळे व उन्हाळ्यात शाळांना सुट्या असल्यामुळे या गोष्टीचा पुरेपूर फायदा घेत काही देगलूर मधील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील वाहनांची गर्दी लग्न समारंभात दिसून येत आहे. यावेळी लग्न सोहळ्यासाठी भाडेतत्वावर पाठविण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मान्यता दिली आहे का ? असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाले आहेत.