दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा तालुक्यातील कृषी सेवा केंद्रानी शेतकऱ्यांना बी – बियाणे,खते एमआरपी दराने द्यावे जादा दराने देऊ नये अन्यथा शिवसेना स्टाईलने किसान सेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असे प्रतिपादन शिवसेना प्रणित किसान सेनेचे तालुकाप्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर यांनी केले आहे.
पुढे किसान सेनेचे तालुकाप्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर यांनी असे नमूद केले की, आता आठवडाभरावर पावसाळा आला असून शेतकरी बांधव हे आपल्या शेतात खरीपाची पेरणी करतात त्यासाठी शेतकरी बांधव हे कृषी सेवा केंद्राहुन ज्वारी,कापुस,मुग, उडीद, तूर, सोयाबीन आदी बियाणांची खरेदी कर्ज काढून करतात पण यात काही लोक जादा नफा कमविण्यासाठी ८०० रुपयांची कापशी बियाणे ची बॅग १५०० रूपयांना विकत असल्या च्या तक्रारी पुढे येत असुन लोहा तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांनी जादा दराने बी बियाणे ,खते यांची विक्री करू नये त्यामुळे शेतकरी बांधव हवालदिल होतो त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते .
तेव्हा याकडे प्रशासनाने ही लक्ष द्यावे व कृषी सेवा केंद्रांनी बी बियाणे ,खते जादा दराने विक्री करू नये अन्यथा शिवसेना स्टाईलने किसान सेनेच्या वतीने आंदोलन छेडून धडा शिकविण्यात येईल असा इशारा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित किसान सेनेचे लोहा तालुका प्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर यांनी दिला आहे.