दैनिकचालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड/विष्णुपुरी :- विष्णुपुरी येथे उड्डाण पुलाची आवश्यकता असल्याबद्दल पेठवडज येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी २०१८ साली केली होती मागणी त्यांच्या या मागणीला यश आले असून पन्नास टक्के काम पूर्ण झाले आहे नांदेड ते लातूर ह्या प्रमुख राज्य मार्गावर ग्रामीण तंत्रनिकेतन कॉलेज, श्री गुरु गोविंदसिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालय डॉ.शंकरावजी चव्हाण जिल्हा रुग्णालय विष्णुपुरी ,विष्णुपुरी गाव आणि त्याच गावात धार्मिक स्थळ तथा पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला आलेले काळेश्वर मंदिर तसेच गर्दीचे ठिकाण असून याच एकमेव मुख्य रस्त्यावरून आम जनतेची आवक जावक असल्याने नेहमीच किरकोळ व मोठे अपघात घडत असतात त्यामुळे यापुढे असे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून याचा गांभीर्यपूर्वक विचार करून या ठिकाणी मोठा व मजबूत उड्डाणपूल तात्काळ उभारण्यात यावा अशी मागणी माजी खासदार अशोकराव चव्हाण साहेब ,माजी आमदार हेमंत पाटील दक्षिण नांदेड, अधीक्षक सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड ,अधीक्षक डॉ.शंकररावजी चव्हाण शासकीय रुग्णालय विष्णूपुरी, प्राचार्य गुरु गोविंदसिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेड, अध्यक्ष काळेश्वर मंदिर संस्थान विष्णुपुरी ,प्राचार्य ग्रामीण तंत्रनिकेतन विष्णुपुरी नांदेड, सरपंच /ग्रामविकास अधिकारी विष्णुपुरी नांदेड यांना निवेदन देऊन सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कंधारे ,व्यंकटी जाधव, विठ्ठल गायकवाड ,गजानन जाधव , हरीचंद्र राजे यांनी मागणी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले असून उड्डाणपूल लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी तयार होऊन प्रवाशांची सोय होणार आहे