दैनिक चालु वार्ता अर्धापूर प्रतिनिधी- मन्मथ भुस्से
महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार- २०२३ देऊन महिलांना सन्मानित केलं.
अर्धापूर/लोणी बु:-अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त सरपंच सौ.वैष्णवी विजय पाटील भुस्से,उप सरपंच श्रीमती.अरुणा भागवत शेंडगे, सदस्य श्री.साहेबराव भुस्से, श्री.गंगाधर बक्केवाड, अतुल लोणे,सौ.शोभा सुरनर, शकुंतला भुस्से, मंजुषा केशव सोनटक्के,ग्रामसेवक अर्चना कवठेकर ग्रामपंचायत कार्यालय लोणी बु च्या वतीने सामाजिक तसेच महिला व बालकल्याण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या बाल विवाह प्रतिबंध, हुंडा निर्मुलन, लिंग चिकीत्सा प्रतिबंध, घरगुती हिंसा प्रतिबंध, महिला
सक्षमीकरण, महिला स्वयंसहाय्यता बचत गट, आरोग्य, साक्षरता मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार या
सारख्या कार्यामध्ये उत्स्फुर्त पणे पुढाकार घेऊन सामाजिक कार्य करत आहेत.पुजा सुरेश देवडे व राधाबाई सखाराम कांबळे या दोन कर्तबगार महिलांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह,शाल व श्रीफळ,रोख रक्कम ५००रु.प्रति महिलेस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मह