दैनिक चालु वार्ता उपसंपादक वाशीम -वसंत खडसे
वाशीम : जिल्ह्यातील रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात काल दिनांक ३० मे रोजी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. सभापतीपदी संजय शिंदे तर उपसभापतीपदी राजाराम आरू विराजमान झाले. यावेळी सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला.
रिसोड~मालेगाव मतदार संघाचे आमदार अमित झनक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पदग्रहण सोहळ्यास शिवसेना ठाकरे गटाचे विश्वनाथ सानप,बाळासाहेब देशमुख, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकार, वंचीत बहुजन आघाडीचे डॉ. रविंद्र मोरे पाटील,राष्ट्रवादीचे तेजराव वानखेडे, पंचायत समितीचे सभापती बंडू हाडे, माजी सभापती तुकारामजी मोरे,भागवत मोरे, संभाजी ब्रिगेडचे आर्जुन पाटील खरात, काँगेस कमिटीचे बबनराव गारडे, प्रकाश वायभासे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नवनिर्वाचित संचालकांचा सुद्धा पदग्रहण सोहळ्यानिमित्त सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमात महाविकास आघाडीतील नेत्यांनी मनोगत व्यक्त केले. व बाजार समितीच्या पुढील वाटचालीसाठी पदाधिकारी आणि नवनिर्वाचित संचालकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी बाबाराव सानप, धनंजय बोरकर, भीमराव शेजुळ, रवी चोपडे, भगवान गाडे, काँगेस कमिटीचे राजू राऊत, बाबाराव ढोणे, डॉ. रामेश्वर नरवाडे, सचिन इप्पर, राजु खांबलकर, वंचीत बहुजन आघाडीचे गिरिधर शेजुळ, प्रदीप खंडारे, खरात पाटील, विश्वनाथ आरु, संजय सदार,गजानन माळेकर, विजय सिरसाठ,विश्वनाथ पारडे, आदिसह, तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
” शेतकऱ्यांना अपेक्षित असलेली, शेतकऱ्यांच्या हक्काची बाजार समिती म्हणून, लवकरच रिसोड बाजार समिती नावारूपास येईल. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा शेगावचे संत गजानन महाराज यांच्या पालखीचा मुक्काम बाजार समितीच्या प्रांगणानात राहणार आहे,मात्र यावेळेस प्रथमच पालखीची पूजा करण्याचा मान सामान्य शेतकरी कुटुंबाला मिळेल याची मी ग्वाही देतो..!
___
अमित झनक
( आमदार,रिसोड~मालेगांव मतदार संघ )
” तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने प्रथमच बाजार समितीवर शेतकऱ्यांचे वर्चस्व स्थापित झाले. आहे पर्यायाने “बळीराजा ” ची सत्ता बाजार समितीत आली आहे. त्यासाठी कुठलेही राजकारण न करता, भेदभाव न ठेवता शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय व बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक असलेल्या सोईसुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येईल..!
बाळासाहेब देशमुख
( मा.अभियंता तथा शिवसेना ठाकरे गटाचे नेते. )