दैनिक चालु वार्ता कळंब- समीर मुल्ला
येथील रोटरी क्लब च्या वतीने शहरातील विविध ठिकाणी आबाल वृद्धांना बसण्यासाठी पन्नास सिमेंट बाकड्यानचे लोकार्पण करण्यात आले. रोटरी क्लब कळंब च्या वतीने शहरातील विविध ठिकाणी अबाल वृद्ध, शाळकरी मुले , महीला,यांना बसण्यासाठी पन्नास सिमेंट बाकडे ठेवण्यात आल्याने चांगली सोय झाली आहे. या उपक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन करसन पटेल यांनी पुढाकार घेऊन रोटरीचे अध्यक्ष डॉक्टर सचिन पवार, सचिव डॉक्टर अभिजीत जाधवर, यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला आहे. शहरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर ,देवी मंदिर, न्यायालय, कळंब तालुका पत्रकार संघाचे पत्रकार भवन, साई नगरी , द्वारका नगरी,विद्याभवन हायस्कूल, क्रीडा संकुल, आदी मोक्याच्या ठिकाणी हे सिमेंटचे बाकडे ठेवण्यात आले आहेत. सकाळी व संध्याकाळी फिरणाऱ्यांची संख्या मोठी असून फिरताना बसण्यासाठी याचा उपयोग होऊ लागला आहे.