दैनिक चालु वार्ता हिमायतनगर प्रतिनिधी-राम चिंतलवाड
मौजे बोंढार हवेली ता.जि.नांदेड या ठिकाणी जातीयद्वेषातुन अक्षय भालेराव या तरुणाची दिवसाढवळ्या निर्गुणपणे हत्या केलेलीआहे.तर मौजे वाळकी बाजार ता.हदगाव येथे महामानव डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांची जयंती गावातुन का काढली? म्हणून मनात द्वेष धरुन सवर्ण समाजातील डोके फिरु लोकांनी दलित वस्तीवर रात्रीला येऊन जीवघेणा हल्ला केला व मातंग समाजातील तरुणास लाठ्या, काठ्या,तलवारी घेऊन बेदम गंभीर मारहाण केलेली आहे.या समाजकंटकाला शासनाकडून कडक शासन करून जन्मठेपेची शिक्षा व्हावी तसेच रेणापूर ता.जिल्हा लातूर येथील मातंग समाजाची गिरधारी तबकाले या तरुणांनी आपल्या घर खर्चासाठी व्याजाचे पैसे घेतले असताना, संबंधित व्याज धारकांनी व्याजाचे पैसे व मुद्दल का दिली नाही?म्हणून त्या तरुणाला बेदम गंभीर मारहाण करून त्याची पण दिवसा ढवळ्या हत्या केली आहे. वरील तिन्ही घटना या दलित,मागासवर्गीय समाजामधिल बौद्ध,मातंग,चर्मकार समाजातील तरुणअसुन यांना यांचा जीव या ठिकाणी गेलेलाआहे.परंतु गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात अशा दलित,मागासवर्गीय जातीवर मोठ्या प्रमाणात अन्याय,अत्याचार, हत्या,खुन,बलात्कार अशा घटना वारंवार घडतआहेत.अशा घटना घडु नये यासाठी राज्य शासनअपयशी ठरलेआहे.या राज्य शासनाचा व घटनेचा जाहीर तीव्र निषेध करून, वरील घटनेतील आरोपीला व मारेकऱ्यांना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी.या साठी राज्य शासनाला शासनाचे त्वरित लक्ष शासनाने त्वरित लक्ष घालावे व वरील खटले हेअति जलद न्यायालयात चालवून या खटल्याचा निकाल लवकरात लवकर लावावा तसेचअन्यायग्रस्तांच्या कुटुंबीयांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे तर मयत कुटुंबाला राज्य शासना कडूनआर्थिक मदत म्हणून पन्नास लक्ष रुपये देण्यात यावे.तसेच आरोपीची संपूर्ण स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्यात यावी,अशी मागणी एका निवेदनाद्वारे तहसीलदार हिमायतनगर यांच्या मार्फत मे. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य शासनाकडे वंचित बहुजनआघाडी तालुका शाखा व लोकस्वराज्यआंदोलन हिमायतनगर कडून यावेळी निवेदनाद्वारे मागणी केलीआहे.या निवेदनावर वंचितचे जिल्हा सहसचिव राजु वाठोरे दुधडकर,लोकस्वराज्य आंदोलनाचे तालुकाध्यक्ष मा.श्री धोंडोपंत बनसोडे, वंचितचे तालुका उपाध्यक्ष आयु विशाल हानवते,शरदचंद्र हनवते,अंबादास वाघमारे,बबन जाधव,संभाजी राऊत,राजकुमार शहाणे,आकाश कदम,पत्रकार सदाशिव पतंगे विरसणीकर सहआदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्याआहेत.वरिल निवेदनाच्या प्रति मे.तहसीलदार डी.एन.गायकवाड,सुर्यकांत ताडेवाड व बी.डी.भूसनुर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिमायतनगरला देण्यातआलेलीआहे.