दैनिक चालु वार्ता उपसंपादक अमरावती -श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : केंद्रातील भाजप सरकारने काढलेल्या अध्यादेश विरोधात आम आदमी पार्टी दिल्ली सरकारच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संपूर्ण राज्यभर आंदोलन,निदर्शने केली.याचेच पडसाद अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे उमटतांना दिसले.
अंजनगाव सुरजी येथील नवीन बस स्टॉप अग्रसेन चौक येथे दिनांक ११ जून २०२३ (रविवार) रोजी आम आदमी पक्ष अंजनगाव सुरजी तालुका कार्यकारणी च्या वतीने केंद्र सरकारने (भाजपा) काढलेल्या अध्यादेशात विरोधात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या सरकारला कायदे बनवण्याचा आणि नोकरशाहीवर नियंत्रण ठेवण्यात अधिकार देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला नकार देणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारच्या अध्यादेश विरोधात आज संपूर्ण महाराष्ट्रभर आम आदमी पार्टीच्या वतीने निषेध,धरणे आंदोलने,निदर्शने करण्यात आली.
या जाहीर निषेध आंदोलनावेळी अंजनगाव सुर्जी तालुकाध्यक्ष भैय्यासाहेब खंडारे,प्रवीण केणे,रवी राक्षसकर,सचिन नागे,सागर खलोकार,रवी शिरसाट,कुंदन मलीये,विशाल इंगळे,राजू खैरे,ऋषिकेश जुनगरे,निलेश बर्डे,अक्षय कोल्हेकर व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.