दैनिक चालु वार्ता दक्षिण तालुका प्रतिनिधी- गोविंद मोरे
मागील सात वर्षा पासून सिडको नांदेड येथे सुजोक, अकुप्रेशर आणि निसर्गोपचार च्या साह्याने हजारो रुग्णावर यशस्वी उपचार करणारे पूजा हेल्थकेअर सेंटर चे संचालक , सुजोक, अकुप्रेसर निसर्गोचार तज्ञ डॉ.संभाजी अवधुतराव पवार आणि त्यांची टीम आळंदी पंढरपूर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सासवड येथील मुक्कामी दि.14आणि15 जून रोजी गुडघेदुखी,कंबरदुखी, मानपाठ दुःखी अश्या दुर्धर आजारावर सुजोक, अकूप्रेसर, मसाज द्वारे मोफत उपचार करणार आहेत.
माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात लाखो भाविक आळंदी ते पंढरपूर पायी चालत जातात ज्यात वयस्कर पुरुष महिलांचा सहभाग असतो हडफसर ते सासवड घाट जवळपास 27 किलोमिटर घाटाचे अंतर चढल्या नंतर प्रचंड थकवा आणि गुडघे दुःखी होऊ शकते म्हणून सासवड या ठिकाणी माऊलीच्या विसाव्या जवळ दि.14आणि 15 जून रोजी डॉ.संभाजी पवार आणि त्यांची टीम गुडघे दुःखी , कंबरदुखी या आजारावर सुजोक आणि मसाज करून मोफत उपचार करणार आहेत.त्यांच्या सोबत डॉ.अवधुत पवार, स. नरेन्द्र सिंघ ग्रंथी, अशोक जाधव, उद्धव जाधव अल्केश भोसीकर,आकाश चीलगर,सूरज राठोड,आकाश जाधव,प्रज्वल पेटकर, उद्धव काकडे, विकास विश्वकर्मा,अरविंद जाधव एक सामाजिक बांधिलकी म्हणून सेवा करणार आहेत.या सोबतच भाविकांना बिस्कीट आणि पाणी बॉटल वाटप करण्यात येणार आहे.
तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.