दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना शहरातील क्रांतीनगर येथे सार्वजनिक बांधकाम विभाग ते राम मंदिर पर्यंत जालना नगरपालिकेच्या माध्यमातून नाल्याची साफसफाई सुरू असून आज शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले क्रांतीनगर येथे भेट दिली यावेळी शिवसेना अल्पसंख्याचे शिवसेना अल्पसंख्याक शहर प्रमुख नेल्सन कांबळे यांनी जालना नगरपालिकेवर आंदोलन केले होते त्याची दखल घेत जालना नगरपालिकेने क्रांतीनगर येथे सार्वजनिक बांधकाम विभाग ते राम मंदिरापर्यंत नाली साफसफाईला सुरुवात केली आहे यावेळी राम खांडेभराड पांडुरंग खैरे जालना नगरपालिकेचे पंडित पवार विलास गावंडे स्वच्छता निरीक्षक लोखंडे यासह जालना नगरपालिकेचे कर्मचारी व प्रभागातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते