दैनिक चालु वार्ता उप संपादक धाराशिव-नवनाथ यादव
भु म/ धाराशिव:-राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वीय सहाय्यक वैद्यकीय मदत अधिकारी डॉ. रवींद्र अनभुले तसेच नामदार प्रा.डॉ तानाजीराव सावंत युवा मंच महाराष्ट्र राज्य यांच्या मदतीने रुग्णास ५०००० रुपये अर्थसहाय्य मिळाले आहे.रुग्णास आर्थिक मदत मिळवण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पांडुरंग धस व ना. प्रा डॉ. तानाजीराव सावंत युवा मंच अध्यक्ष तथा युवासेना शहर प्रमुख प्रभाकर शेंडगे यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे जाधव कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.भूम येथील उमेश जाधव हे कॅन्सर या आजाराने ग्रस्त झाले आहेत.त्यांना पुढील उपचारासाठी आर्थिक मदतीचा हातभार कमी पडत असल्यामुळे त्यांनी ना.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत युवा मंच यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. परिस्थिती हलाखीची असल्याने उपचारासाठी आर्थिक गरज असल्याचे निदर्शनास आणून दिले.आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्याकडून मदतीची अपेक्षा बाळगली. तात्काळ शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पांडुरंग धस व ना.प्रा.डॉ. तानाजीराव सावंत युवा मंच चे अध्यक्ष प्रभाकर शेंडगे यांनी वैद्यकीय मदत अधिकारी डॉ.रवींद्र अनभुले यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी चा अर्ज पाठवून तत्काळ रुग्णाला मदत करण्यास सांगितले.डॉ अनभुले यांनी विशेष निधी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत पन्नास हजार रुपयाचे अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले. याकामात वैद्यकीय मदत अधिकारी बाळासाहेब निंबाळकर यांनी देखील मदत केली.जाधव कुटुंबीयांनी मंत्रीमहोदय तानाजीराव सावंत,अधिकारी वर्ग ,व ना प्रा.डॉ तानाजीराव सावंत युवा मंच चे आभार मानले आहेत.