दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मेहकर-सागर पाटील गव्हाड
मेहकर येथील
भिमयोद्धा सामाजिक संघटनेचे संस्थापक डॉ.विकी सरदार यांच्या वाढिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय मेहकर, दिवठाने हॉस्पिटल मेहकर व विवेकानंद अपंग विद्यालय हिवरा आश्रम या ठिकाणी संघटनेचे अध्यक्ष वैभव घेवंदे व पदाधिकारी यांनी फळ वाटप केले.डॉ.विकी सरदार हे अपघातामधून वाचल्या मुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वेगळ्या पद्धतीत वाढदिवस साजरा केला.यावेळी डॉ रुपम दिवठाणे सरांनी दुसऱ्या दिवशी जागतिक पर्यावरण दिन असल्यामुळे डॉ विकी सरदार यांना वृक्ष भेट देऊन पर्यावरण अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न शील रहा असा सल्ला दिला. अपघातामधून बरे करण्यासाठी डॉ रूपम देवठाणे सर व विलास हिवरकर यांचे आभार डॉ.विकी सरदार यांनी मानले. माझ्या दुःखा मध्ये ज्यांनी मला सहकार्य केले त्या सर्व डॉक्टर्स ,नातेवाईक,मित्र परिवार यांचा मी आजन्म ऋणी आहे.डॉ विकी सरदार यांचे समाजकार्यात मोठे योगदान आहे त्यांनी शिक्षक कॉलनी मेहकर मधून पहिली डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीची सुरुवात केली आहे,प्रबोधनात्मक कार्यक्रम बरेच राबविलेले आहे.