दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी:- दशरथ आंबेकर
किनवट
नांदेड जिल्ह्यामधिल किनवट ता0लुक्यातील दुर्गम भागातील मौजे सलाईगुडा येथील महिला एसटी चालक अर्चना आत्राम यांनी आपले नाव महाराष्ट्र राज्यात प्रथम बसचालक महिला इतिहासात प्रथमच नोंद झाली आहे.ही महिला किनवट अतिदुर्गम आदिवासी समाजातील गरीब शेतमजुरांच्या लेकीने प्रथम सासवड ते जेजुरी या मार्गाने बस चालवण्याचे भाग्य लाभले.या आदिवासी महिलेची पुणे जिल्ह्यातील सासवड ते जेजुरी आगारात चालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्याच्यां सोबतीला प्रथम वाहक म्हणून संदिप कोलते हे अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे लाभले आहे.प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे.आपल्या मनोगतात सांगितले की, माझ्या आत्मविश्वासाने आणि आई-वडिलांची साथ मिळाल्यामुळे पुणे जिल्ह्यातील सासवड ते जेजुरी- राख निरा या केंद्रातुन मी एसटी बसचालक झाले .महामंडळाच्या चालक पदासाठी रुजु होऊन एसटीच्या अमृत महोत्सव वर्षात मला चालक पदी नियुक्ती झाल्यामुळे मला आणि माझ्या तालुक्यातील सर्वांना खूप आनंद झाला आहे.या माध्यमातून मला सासवड तालुक्यातील प्रवासी गळूंचे चे गावात पहिली महिला चालक यांचा पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. ही नियुक्ती झाल्यामुळे किनवट तालुक्यातील अनेक आजी माजी राजकीय,सामाजिक,शैक्षणिक, पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक करुन पुढील कार्यास शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.