दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड- गोविंद पवार
लोहा तालुक्यातील बोरगाव आ येथील शिवतेज युवा जनकल्याण सेवा प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील रुग्णांचे देवदूत हजारो रूग्णांना जीवनदान देणारे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख श्री मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शालेय साहित्य वाटप मोफत खाऊंचे वाटप शासकीय रुग्णालयात फळे वाटप करण्यात येणार असुन स्थलांतरित कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शालेय साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती शिवतेज युवा जनकल्याण प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरज गोविंदराव तेलंगे यांनी दिली आहे.