दैनिक चालु वार्ता उप संपादक धाराशिव-नवनाथ यादव
:भूम/धाराशिव:-तालुक्यातील पाथरूड येथील कु. स्नेहा राजाभाऊ दुधाळ हिने 6 जून रोजी शिमला येथे पार पडलेल्या इंडियन नॅशनल डान्स स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून पाथरूड गावचा नावलौकिक वाढविल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने तिचा सत्कार करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.स्नेहाने सहभागी घेतलेल्या स्पर्धेमध्ये तब्बल बाराशे स्पर्धक सहभागी झाली होते,तेवढ्या स्पर्धकांमधून स्नेहा जिद्द चिकाटी व संघर्षाच्या बळावर प्रथम क्रमांक मिळवून आपल्या जिल्ह्याचे तालुक्याचे व गावाचे नाव उज्वल केले याबद्दल गावकऱ्यांनी तिचे मनापासून कौतुक केले.अपार कष्ट करून हे यश संपादन करण्यासाठी तिला मार्गदर्शन करणारे गुरुजन पालक व इतर सहकारी यांचा सुद्धा गावकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.सांस्कृतिक वारसा आणखीन वाढविण्यासाठी कलाकारांना लागणारे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत आणखीन प्रयत्न करेल असा विश्वास याप्रसंगी गावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आदींनी व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या प्रसंगी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.चेतन बोराडे,गावचे सरपंच शिवाजीराव तिकटे,उपसरपंच प्रा.तानाजी बोराडे,संजय काका बोराडे,ग्रामपंचायत सदस्य युसूफ तांबोळी,सेवक तिकटे,धोंडीबा टिळक,शहाजी आठवले,अशोक भसाड,बाप्पा पवार,सोसायटीचे संचालक धनंजय बोराडे,उपसंचालक संदिपान पवार,अण्णासाहेब पवार,मोहन बोराडे,रावसाहेव बोराडे,तात्या भोरे,ग्राम अधिकारी भागवत राठोड,महादेव वडेकर,रमेश वारे,प्रकाश बोराडे,अंकुश बोराडे,मारुती दुधाळ,लिपिक अशोक बोराडे,विलास जाधव नागेश पवार,योगेश बोराटे,संतोष टिकटे यांच्यासह इतर गावकरी आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल तिकटे,प्रस्ताविक डॉ.चेतन बोराडे,तर आभार संजय बोराडे यांनी मानले.