दै चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली : एअर चीफ मार्शल आर.के.एस.भदोरिया गुरुवारी वायुदल प्रमुख पदाहून सेवानिवृत्त झाले असून एअर चीफ मार्शल विवेक चौधरी यांनी त्यांच्याकडून पदाची सूत्र स्वीकारली. एअर चीफ मार्शल विवेक चौधरी हे मूळचे नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्याच्या हस्तरा येथील आहेत. त्यांनी नांदेड येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले व पुढे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी आणि वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेज मधून शिक्षण पूर्ण केले. २९ डिसेंबर १९८२ रोजी ते वायुसेनेच्या फायटर स्ट्रीममध्ये रूजू झाले .त्यांनी यापूर्वी वायुदलाचे उपप्रमुख तसेच वायुदलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर इन चीफ म्हणून कार्य केले आहे.
देशाच्या संरक्षणाची धुरा मराठी खांद्यावर असणार आहे. कारण संरक्षण दलाच्या तीन प्रमुख दलांपैकी दोन दलांचे प्रमुख एकाच वेळी मराठी व्यक्ती असणार आहेत. एअर चीफ मार्शल विजय चौधरी यांनी गुरुवारी देशाचे नवे हवाई दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला त्यानंतर हा अनोखा योग जुळून आला आहे.कारण सध्या लष्करप्रमुख म्हणून जनरल मनोज नरवणे हे काम पाहत आहेत.