दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई प्रतिनिधी किशोर फड
दै.चालू वार्ता वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी श्री किशोर फड यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
अंबाजोगाई येथे दिनांक ६/८/२०२३ रोजी रोटरी क्लब अंबाजोगाई यांच्या वतीने जागृत देवस्थान बडा हनुमान सदर बाजार येथे शेकडो वर्ष ज्यांचं जीवनमान आहे असे वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आलं .
कार्यक्रमा प्रसंगी दैनिक चालू वार्ता चे जिल्हा प्रतिनिधी श्री किशोर फड यांचे रोटरी क्लब अंबाजोगाई वतीने ‘दै.चालु वार्ता पुरस्कार 2022- 23’ पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या.
सदर कार्यक्रमाला सर्व श्री रो. रोटरी सचिव रो. स्वप्निल जी परदेशी, गणेशजी राऊत ,ओमकेश मामा दहिफळे, सोलंकी शेठ ,तालुका आरोग्य अधिकारी श्री लोमटे सर, दिलीपजी काळे,मनोज मुंडे सर, शिरसाट सर हे व ईतर मान्यवर उपस्थित होते.
वृक्षाबद्दल माहीती व जिम्मेदारी व आपल्याला वृक्षारोपण किती महत्त्वाचे याचे महत्व रोटरी क्लबचे पदाधिकारी रो. दिलीप जी काळे यांनी सांगितले
रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी,सदस्य यांचे स्वागत व आभार बढा हनुमान, बालाजी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष च्या वतीने श्री किशोर फड यांनी मानले.
संपूर्ण कार्यक्रम नियोजन क्रिकेट अकादमी चे सर्वेसर्वा श्री मोहित परमार सर व मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लबचे सचिव श्री स्वप्निलजी परदेशी यांनी केले तर आभार हनुमान ट्रस्ट सदस्य श्री किशोर फड यांनी मानले .
कार्यक्रमाला परमार सर यांच्या अकॅडमी चे शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.