जिल्हा पोलिस अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी…
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
लोहा शहरसह ग्रामीण भागात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले असुन याकडे स्थानिक पोलीसांनी आपले हात ओले करून या अवैध धंद्याला मुकसमंती दिली असल्याची चर्चा जनतेत होत असुन त्यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे तेव्हा याकडे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तात्काळ लक्ष देऊन लोहा शहरसह ग्रामीण भागात अवैध धंदे तात्काळ बंद करावेत अशी मागणी जनतेतून होत आहे.
लोहा शहर चौरस्त्यावरील व३६१ या राष्ट्रीय महामार्गावरील वाढते तालुक्याच्या ठिकाणचे शहर असून एक महत्वाची व्यापरपेठ , शैक्षणिक केंद्र , तालुक्याचे मुख्यालय असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते यात नागरिकांना आकर्षीत करण्यासाठी मटका माफियांने शहरात सर्वच भागात आपले बीटर नेमवून अवैध मुंबई- कल्याण नावाचा मटका जुगार सुरू केला आहे . तसेच महाराष्ट्र शासनाने तंबाखू मिश्रीत गुटखाबंदी कायदा गेली अनेक वर्षांपासून लागू केला आहे पण हा कायदा लोहा शहर व तालुक्यात केवळ कागदावरच आहे तसेच अनेक हाॅटल्स ,ढाबे, पानटपरऱ्या आदी ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री होत आहे तर माळरानाकडे गावठी दारुची विक्री होत आहे बैल बाजार परिसरात गांजाची अवैध विक्री होत आहे. तसेच
लोहा शहरात वाहतुकीची कोंडी झाली असून रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा होत आहे .काळी पिवळी व खाजगी बसवाले हे जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून बस स्थानकाजवळ वाहने भरीत आहेत मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी भरीत आहेत वाहने भरधाव वेगाने चालवित आहेत. शहरातील मुख्य रस्ता चौपदरीकरणाचा असुन या रस्त्यावर अनेक वाहने व हातगाडेवाले हे रस्त्याच्या मधोमध गाडे उभे करीत आहेत त्यामुळे नागरिकांना रहदारीस मोठी अडचण होत आहे.
तसेच लोहा शहरात तळीरामाने सार्वजनिक ठिकाणी हैदोस घातला आहे यामुळे कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे.
एकंदरीत. लोहा शहरातील या सर्व अवैध धंद्याला स्थानिक पोलीसांचे अभय असुन याकडे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तात्काळ लक्ष देऊन लोहा शहरासह ग्रामीण भागातील अवैध धंदे तात्काळ बंद करावेत अशी मागणी जनतेकडून होत आहे.