दै.चालु वार्ता
उस्माननगर प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज पाटील जरांगे यांचे आमरण उपोषण सुरू होते. त्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लोहा तालुक्यातील पोखरभोसी येथे उपोषण सुरू केले आहे उपोषणला बसण्याठी परवानगी घेण्यासाठी दिनांक ११सप्टेंबर रोजी लोहा तहसील कार्यालयावर मोटरसायकलची रॅली काढून पोखरभोसी ते लोह्या पर्यंत सकल मराठा समाज बांधवाकडून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले व १२ सप्टेंबर पासून उपोषणास सुरुवात केली .पोखरभोसी येथील गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार व पुढार्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले पोखरभोसी तालुका लोहा या गावातील ग्रामस्थांनी मराठा समाजास आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी व निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून तशी लेखी निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले लोहा तालुक्यातील व महाराष्ट्रातील मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी व जालना जिल्ह्यातील मनोज पाटील जरांगे यांचे अमरण उपोषण ,आंदोलन सुरू होते त्यांना पाठिंबा व मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी लोहा तालुक्यातील पोखरभोसीतील श्रीनिवास नारायण ताटे( छावा तालुका अध्यक्ष )संदीप कंटिराम डांगे,सुभाष बळीराम ताटे, खुशाल पंडितराव डांगे हे गावकऱ्यांच्या वतीने अमरण उपोषणास हे नवयुवक तरुण बसले होते त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी दि.१३ सप्टेंबर रोजी उपोषणस्थळी जाऊन पुरूषोत्तम भाऊ धोंडगे,बालाजी जाधव ( जिल्हाध्यक्ष संभाजी बि.),बळीराम पवार ( मराठा सेवासंघ उपाध्यक्ष ),हरिभाऊ शिंदे ,नितिन पाटील केकाटे ( कंधार ता.अध्यक्ष संभाजी ब्रिगेड ) ,राजेंद्र नामवाडे ,संदिप कांबळे ,शंकराव पाटील घोरबांड कलंबर ( खुर्द ) येथील प्रतिष्ठित नागरिक तथा सामाजिक कार्यकर्ते यांनी भेट घेतली व अनेक कार्यकर्त्यांनी भेट दिली यावेळी गावातील असंख्य नागरिक उपस्थिती होते.याच दिवशी उपोषणकर्त्यास प्राथमिक आरोग्य केंद्र कलंबर बुद्रुक येथील कर्मचाऱ्यांनी भेट देऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली व शुगर , बीपी तपासणी केली यामध्ये डॉक्टर अनलोड, फार्मसी दासरवाड,परिचारक चंदेल शिवदर्शन, व वहान चालक प्रदीप मेहकर यांची उपस्थिती होती यांनी उपस्थिती राहून उपोषणकर्त्यांची तपासणी केली यानंतर दि. १४ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीतीने मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण संपले हे समजताच पोखरभोसी येथील उपोषण कर्ते यांनी छत्रपती शिवाजीमहाराज याच्यां पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांच्या कळ्यातील ताईत ,गणिताचे गाडे अभ्यासक श्री अनिरूद्ध सिरसाळकर यांच्या हस्ते व ज्युस पिवून उपोषणाची सांगता करण्यात आली .यावेळी गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.