दै.चालू वार्ता
प्रतिनिधी,उमापूर कृष्णा जाधव
गेवराई,उमापूर, मधील अंगणवाडी सेविका व पंचायत समिती अधिकारी
यांच्या संयुक्त कार्यक्रम उमापूर अंगणवाडी क्रमांक सात मध्ये पार पडला.
कार्यक्रमाचे उपस्थिती बाल विकास प्रकल्प अधिकारी गेवराई-1
सी डी पी ओ थोरात साहेब, एम के स्वामी सुपरवायझर, व सर्व कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, या कार्यक्रमासाठी उमापूर मधील गरोदर माता-भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थिति दाखवली.
बाल विकास अधिकारी थोरात साहेब यांनी या कार्यक्रमाचे मार्गदर्शन केले असता.कार्यक्रमाच्या वेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.या कार्यक्रमात हिरवे पालेभाज्या, विविध प्रकारचे फळे
व इ. वस्तूंनी गरोदर माता भगिनींची ओटी भरण्यात आली.
या कार्यक्रमाला गावातील महिलावर्ग उपस्थित असून हा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडला.सरस्वती कातकडे, जयश्री भालशंकर, सुधारणा सौंदरमल, गीता जामकर, जनाबाई सोनवणे, रूक्मीन जगताप, रेखा येटाळे, छाया कानडे,
हिरा वाघमारे, सुमन आहेर, राजश्री चौधरी
सीमा ढवळे, मिरा मतकर, विमल झाळे
व इतर सर्व महिला सेविका अंगणवाडी
सेविका, व मदतनीस यांच्या संयुक्त विद्यमानाने, हा कार्यक्रम सुरळीत पार पडला.