दैनिक चालू वार्ता
उपसंपादक धाराशिव नवनाथ यादव
धाराशिव: (भूम):- तालुक्यातील आष्टा गावची कन्या श्रावणी संतोष (बापूराव) गिलबीले( ८वी) हिचा घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेत धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला असून तिने घवघवीत यश संपादन केले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत शेतकरी कुटुंबातील लेकीचा सन्मान करून सत्कर करण्यासाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी खूप मोठ्या अभिमानाने आष्टा येथील सर्व ग्रामस्थ,जि.प.के.प्रा शाळा,विद्या मंदीर हायस्कूल सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
यावेळी ग्रा.पं.कार्यालय आष्टा,सरपंच सुनिल जाधव,ग्रामविस्तार अधिकारी संजय केंद्रे,सर्व सदस्य, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष,तंटा मुक्ति अध्यक्ष, सोसायटीचे चेअरमन,व्हॉईस चेअरमन, तलाठी पंडित मॅडम, आरोग्य अधिकारी,शिक्षक वर्ग यांच्या हस्ते प्रोत्साहन म्हणून रोख ५००० रुपये बक्षीस देण्यात आले.
पुढील काळात काही अडचण आल्यास सर्व ग्रामस्थ खंबीर पणे मदत करण्यासाठी पाठीशी राहतील अशा ग्वाही ग्रामस्थांनी दिली. ग्रामपंचायतच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. शालेय क्रीडा स्पर्धामध्ये कुस्ती या क्रीडा प्रकारात धाराशिव जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून आपल्या गावचे नाव उज्वल केले. सर्वत्र कौतुक होत आहे.