दैनिक चालू वार्ता
बल्लारपूर प्रतिनिधी कमलेश नेवारे
बल्लारपूर: जन सेवा हीच ईश्वर सेवा सुधीरभाऊ जनसेवा बहुउद्देशीय संस्था बल्लारपूर रजि. नं.- चंद्रपूर/0000113/2022 ( श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर ) तर्फे बल्लारपूर शहरातील नदी काठावर गौरी विसर्जन साठी येणाऱ्या महिला व लहान मुलं यांना पिण्याच्या पाणी चे सोय म्हणजेच पाणपोई लावण्यात आली.हि पाणपोई सकाळी 9 ते सायंकाळ 4 वाजेपर्यंत लावण्यात आली.जेणेकरून जेष्ठगौरी पूजनाच्या दिवशी महिला आपल्या पतीच्या आरोग्यासाठी व त्याच्या लांब आयुष्यासाठी पूजा व उपास करून आपली पतीच्या प्रती असलेली आपली भक्ती व्यक्त करतात. अशातच बल्लारपूर शहरातील नदिकाठावर येऊन 70 ते 80 पायऱ्या उतरून गौरी विसर्जन करतात. अशातच त्यां उपाशी असतात आणि शहरातील उष्णता हि बाब लक्षात घेऊन बल्लारपूर शहरातील समाजसेवी संस्था सुधीरभाऊ जनसेवा बहुउद्देशीय संस्था बल्लारपूर रजि. नं.- चंद्रपूर/0000113/2022 ( श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर ) तर्फे बल्लारपूर शहरातील नदी काठावर पाणपोई ची व्यवस्था केली.
या पाणपोई मुळे महिलांना व लहान मुलांना खूप मोलाची मदत झाली व सर्व महिला या आमचे दैवत, आमचे गुरु आदरणीय श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार जी यांना आशीर्वाद देत होते. सुमारे दीड ते दोन हजार महिलांनी या पाणपोई चा उपभोग घेतला. या सत्कार्यात सुधीरभाऊ जनसेवा बहुउद्देशीय संस्था बल्लारपूर चे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर जी, श्रीनिवास मधीकुठा जी सुधाकर सिक्का जी, श्रीनिवासन पिसार जी,कमल वर्मा जी, विनोद कोवे जी,रोहित गुप्ता जी, उज्वल बुरांडे जी , आणि आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.