दैनिक चालू वार्त
प्रतिनिधी भरत पाटील पवार…
लोहा तालुक्यातील युवा प्रगतशील शेतकरी रत्नाकर गंगाधर ढगे यांना नुजिवीडू कंपनीकडून 2022 खरीप हंगामामध्ये कापसाचे एकरी 18 क्विंटल उत्पादन घेतल्याबद्दल महा विजेता सन्मानपत्र आणि चांदीचं नाणं देऊन सन्मानित करण्यात आलं त्यांचा सन्मान थेट कापूस पिकाच्या शेतीमध्ये सुरेश कुऱ्हाडे जिल्हा प्रतिनिधी नीजीवूडू सीडस लिमिटेड यांनी दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी केला त्यांनी एवढे उत्पादन घेण्यामागे शेतीला जोडधंदा असलेल्या लाल कंधारी गायीच्या
शेणखत पासून व निसर्गातील झाडपाल्यापासून दशपर्णी अर्क लिंबोळी अर्क बर मास्तर इत्यादी प्रयोग करून व कापूस पिकांमध्ये कामगंध सापळ्यांचा वापर करून पक्षी थांबा बसून हे यश मिळवल्याचे सांगितले यावेळी गंगाधर ढगे उत्तम बापूराव ढगे रामकृष्ण ढगे स्वप्नील ढगे भुजंग ढगे हरिचंद्र ढगे केशव ढगे सुदाम ढगे मदन ढगे मुरलीधर ढगे मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते…