पालक मेळाव्याला पालकांचा उदंड प्रतिसाद…
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनीधी माधव गोटमवाड
नांदेड / कंधार :- मुखेड येथूनच जवळ असलेल्या सावरगाव (नि) येथील स्टार पब्लिक स्कूलमध्ये मागील २ वर्षापासून सातत्यपूर्ण विद्यार्थ्यांचा परिपूर्ण अभ्यास व गुणवत्ता तसेच मार्गदर्शन यासह स्पर्धात्मक परीक्षा याचा आलेख पाहता हि शाळा शैक्षणिक गुणवत्ता वाढीचे केंद्र बनले आहे असे प्रतिपादन ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर येथील प्रा.डॉ.डी.सी.पवार यांनी दि.२१ ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या पालक मेळाव्यात बोलताना केले. स्पर्धेच्या युगात इंग्रजी माध्यम प्रभावशाली झाले असून ती काळानुरूप गरज बनली आहे. हीच भावना पालक व विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवली असल्याने भारत टॅलेंट सर्च,ब्रेन डेव्हलपमेंट, नवोदय, मंथन, श्रेया, प्रति माह घटक चाचणी यांसह अन्य शैक्षणिक उपक्रमासह शुद्धलेखन, पाठांतर, वाचन, शब्दाची अक्षर ओळख अशा विविधांगी उपक्रमासह विद्यार्थ्यांना थोर विचारवंताची ओळख व त्या बद्दलची माहिती प्रभावीपणे बाल मनावर संस्कार रुजवण्याचे काम केले जाते असे पुढे बोलताना प्रा.पवार म्हणाले, तर पालक प्रतिनिधी म्हणून बोलताना व्यंकटराव वडजे यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना संजीवनी देणारी हि शाळा ग्रामीण भागात सुरु करून या भागातील इंग्रजी शिक्षणापासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांना ज्ञानाचे मंदिर उघडे केले.त्या ज्ञान मंदिरात १५० विद्यार्थ्यांवर इंग्रजीसह मराठी अभ्यासक्रमही शिकवून विद्यार्थ्यामध्ये शैक्षणिक परिपक्वता निर्माण केली यासाठी या शाळेचे प्राचार्य संजय पवार यांची ओळख आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आराध्या गोरे ह्या मुलीने स्वागतगीत सादर केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानोबा पाटील वडजे तर प्रमुखे पाहुणे म्हणून प्रा.डॉ.डी.सी.पवार हे होते. उपस्थितांचे स्वागत करून सत्कार केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य संजय पवार, सौ.वैशाली पवार, कु.प्रियदर्शना चव्हाण, कु.अर्चना येलमे,कु.शिंदे,सौ.मुदळे, सौ. अस्मिता राठोड,सौ.कांबळे, तातेराव पा.वडजे, माधव चिंचोले,रमेश राठोड, यांनी परिश्रम घेतले तर शाळेमध्ये राबवलेल्या उपक्रमाचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर व्यवहारे यांनी केले तर प्रास्ताविक कु.प्रियदर्शना चव्हाण यांनी केले तर आभार प्राचार्य संजय पवार यांनी मानले.