दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे(इंदापूर):शेटफळ हवेली येथील शिवजयंती उत्सव मंडळ यांच्या वतीने शिवजयंती निमित्ताने दरवर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते, यावर्षी ही विविध कार्यक्रमांचे आयोजन शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमात सर्वात महत्त्वाचे म्हणजे रक्तदान शिबीर हे असते. जे लोकांचे जीव वाचू शकतात जगात सर्व प्रकारचे कारखाने आहेत आणि सर्व प्रकारच्या वस्तू त्या कारखान्यात बनवल्या जातात पण ब्लड अशी वस्तू आहे की ज्याचा नाही कारखाना आहे ना ते कारखान्यात बनवले जाते. ते एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीला दिले जाते म्हणूनच रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान जगाने मान्य केलेआहे. आणि शिवजयंती निमित्त जर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना जर अभिवादन करायचे असेल तर त्यांना या माध्यमातून करण्यासाठी सर्व शिवभक्तांनी जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करून दुसऱ्याचे जीवन वाचवावे.असे आवाहन शिवजयंती उत्सव मंडळ शेटफळ हवेली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्त सोमवारी दि.१९ फेब्रुवारी २०२४ सकाळी ९.३० वाजता प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात होणार आहे.या नंतर सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी रक्तदात्यांना शिवजयंती उत्सव मंडळ यांच्या वतीने आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे ,तरी या रक्तदान शिबिरामध्ये शेटफळ हवेली व पंचक्रोशीतील जास्तीत जास्त शिवप्रेमींनी सहभागी व्हावे असे आव्हान शिवजयंती उत्सव मंडळ व समस्त ग्रामस्थ शेटफळ हवेली यांच्या वतीने करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजता शिवचरित्र व्याख्याते कु. ऋतुजा शिवाजी रणवरे यांचे छत्रपती शासन या विषयावर व्याख्यान होणार आहे.यानंतर सायं ७ वाजता आकर्षक मिरवणूक सोहळा काढण्यात येणार आहे यामध्ये शिवकालीन मर्दानी खेळ, लाठीकाठी ग्रुप पंधारवाडी हे आपले कौशल्य दाखवणार आहेत.या सर्व कार्यक्रमा नंतर सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या वर्षी शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने मंगळवार दि.२०: फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजता महिलांसाठी प्रथमच होम मिनिस्टर बरोबरच विविध महिलांचे खेळ होणार आहेत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पाटील करणार आहेत.या सर्व कार्यक्रमांचे आयोजन भैरवनाथ मंदिर शेटफळ हवेली या ठिकाणी करण्यात आले आहे.