दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड :-दि.१४ फेब्रुवारी २०२४ रोजी, नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे मान्यवरांच्या हस्ते श्री अक्षय उत्तमराव सोनकांबळे यांना नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.यावेळी डॉ. उत्तमराव सोनकांबळे (नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश) श्री. प्रसादभाऊ पवार (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नांदेड शहर) श्री. फिरोजभैया पटेल (शहर कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड) श्री. तेजिंदरसिंघ ढाकनीवाले (कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नांदेड शहर) श्री. ॲड. बाळासाहेब सोनकांबळे (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामजिक न्याय विभाग नांदेड) श्री. संभाजीभाऊ मुकनर (अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस नांदेड ग्रामीण) श्री. अतुलभाऊ हिंगमिरे (जिल्हाध्यक्ष, नांदेड उत्तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस) यांची उपस्थिती होती. अक्षय सोनकांबळे यांच्या निवडीचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.शुभेच्छाचा वर्षाव होत आहे भावी वाटचालीस शुभेच्छाऐ देत आहेत. त्याबद्दल श्री अक्षय उत्तमराव सोनकांबळे यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत आणि पुढील काळात असेच सहकार्य असूद्या असे म्हटले आहे.