
भाजपा वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष (लाला) खांदवे यांच्या वतीने लोहगाव परिसरातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना लोहगाव भूषण पुरस्कार तसेच परिसरातील महिला भगिनींसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम व भव्य लकी ड्रॉ बक्षीस वाटप भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या व भाजपा. पुणे शहर मा. आ. जगदीश मुळीक हस्ते संपन्न झाला.
आपल्या भागातील उल्लेखनीय काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना लोहगाव भूषण पुरस्कार त्यांना सन्मानित करून त्यांच्या कार्याचा गौरव करणे ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. आज झालेल्या सोहळ्यात ज्या मान्यवरांना लोहगाव भूषण पुरस्कार मिळाला त्यांचे मनापासून अभिनंदन केले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ व पुणे शहर मा. आ. जगदीश मुळीक यांच्या सह मा.आ बापूसाहेब पठारे, नगरसेवक योगेश मुळीक, राहुल भंडारे, मुक्ता जगताप, संतोष खांदवे,वंदना खांदवे,संतोष राजगुरू, राजू बाफना, प्रताप मोहिते, नितीन जाधव, विजय चौगुले, मोहन शिंदे सरकार, रावसाहेब राखपसरे, सुनिल खांदवे,संतोष खांदवे,संदिप मोझे, सुभाष चव्हाण, चंद्रकांत जंजिरे, शामा जाधव, दिपक मोझे, दिलीप राखपसरे, बंटी जंगम, आदित्य खांदवे,सचिन खांदवे,हनुमंत खांदवे,सुरज निंबाळकर, रुपेश पवार, मयूर खांदवे यांच्यासह पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.