
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
हदगाव तालुका प्रतिनिधी ÷ सचिन मुगटकर
हदगाव नगरपरिषदेची निवडणूक ही स्थानिक आमदारांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर नव्हे तर, ज्या-त्या वॉर्डातील नगरसेवकांनी केलेल्या वॉर्डातील नागरी विकास कामांच्या मुद्द्यावर लढली जावी. असे सुजान नागरीक बोलतांना दिसत आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता त्यांच्य गत निवडणुकीत आपल्या वॉर्डातील विजयी नगरसेवकांने त्यांच्या
जाहिरनाम्यात कथन केलेली नागरी विकास कामे महापालिकेच्या माध्यमातून पूर्णत्वास नेली आहे का? वार्डातील जनतेला कोणत्या प्रकारची अडचण आहे हे येऊन पाहीले का? कारण, वॉर्डातील ही नागरी विकास कामे आवश्यकतेनुसार प्राधान्यक्रमाने वॉर्डाचा ‘सेवक’ म्हणून नगरसेवकाने ती प्रशासनाला सुचवायची असतात. तसेच, सुचविल्यानंतर विहित पाठपुराव्याने संपूर्ण कामे वेळेत पूर्ण करून घ्यावयाची असतात. तसेच, वॉर्डातील सर्व विकासकामे ही गुणवत्तापूर्ण आहेत की नाही
यावरही लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही नगरसेवकाची असते. तर,ज्या
कामांसाठी नगरसेवकाला निवडून दिले त्यासंबंधीची जबाबदारी नगरसेवक खरोखरच योग्यरीत्या पार पाडत आहे की नाही.!यावरही ज्या-त्या वार्डातील जनतेने लक्ष
ठेवणे गरजेचे असते. सध्या हदगाव तालुक्याचा विकास हा समर्थकांकडून लोकनेते म्हणून प्रसिद्ध
असणाऱ्या आमदारांच्या मार्फत झाला असल्याचे भासवले जात आहे. मग,
नगरसेवक आणि नगरसेविका यांनी गेली पाच वर्षे निवडून आल्यावर काय
माश्या मारायचे काम केले काय? असे प्रश्न प्रतेक वार्डात जनतेतून केल्या जात आहे. तर, जनतेने नगरसेवकांना निवडून देताना कोणत्याही आजी माजी च्या भरवश्यावर नव्हे, तर त्या नगरसेवक-नगरसेविकेमध्ये असणाऱ्या जनकार्य करण्याच्या सत्त्येकडे पाहून निवडून दिले होते. आणि, जर आमदारांनी म्हणण्यानुसार कामे होणार असतील व या आमदारांना शहरा बाबत एवढा अभ्यास असेल तर त्यांनी नगरसेवक पदाची निवडणुक लढवावी आणि विधानसभेला इतरांना संधी द्यावी… असे जनतेतून सुजाण नागरीक बोलत आहेत
नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनीही वॉर्डातील
जनतेचे ऐकून व त्यांच्याशी चर्चा करून आप-आपला जाहीरनामा
बनवावा, आमदारांच्या जीवावर निवडणूक लढवणारे उमेदवार कायम परावलंबी म्हणूनच राहणार असे काही वार्डातील नागरीक बोलतांना दिसून येत आहे.