दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- लोहा नगरीचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री गजानन सावकार सुर्यवंशी यांच्या वाढदिवसाचे औचित्य दि. २६ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत पवार गल्ली जुना लोहा येथे ” आई माझी मायेचा सागर” फेम सुप्रसिध्द किर्तनकार श्री पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांच्या भव्य किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती ह.भ.प. भालेराव गुरुजी लोव्हेकर ,हे.भ.प.केशव महाराज पालमकर,ह.भ.प. आत्माराम महाराज रायवाडीकर ,ह.भ.प. लक्ष्मीकांत महाराज दत संस्थान लोहा,गायक सोपान काका बोबडे (. संगीत अलंकार), शंकर म.लोढे ( संगीत विशारद) , मोतीराम म.मोहिते ( संगीत विशारद), नादब्रह्म सदानंद गुरुजी रायवाडीकर, वादक कृष्णा महाराज भोरकडे( तालमणी), विशाल म.बोरूळे ,व रामनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था सादलापूर व भजनी मंडळी आदी उपस्थित राहणार आहेत. तेव्हा या कार्यक्रमाचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक केशव पाटील पवार, बाळासाहेब कतुरे यांनी केले आहे.