दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- हिंदूऱ्हदयसम्राट स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 व्या जन्मदिना निमित्य बाळासाहेबाच्या विचारा प्रमाणे व शिवसेना पक्षाच्या ध्येय धोरणाप्रमाणे ८०% समाजकारण व २० % राजकारण हा संकल्प करत उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पा.कऱ्हाळे यांच्या पुढाकाराने लोहा शहरात महारक्तदान शिबिर व शिवसेना पक्ष नोंदणीसह विविध सामाजिक उपकरण राबवत वंदनिय बाळासाहेब ठाकरे याची जंयती साजरी करण्यात आली.
या रक्तदान शिबिराला लोहा येथुन भव्य प्रतिसाद मिळाला यामध्ये , विविध पक्ष संघटनेच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक व पञकार क्षेत्रात बांधवांनी रक्तदान शिबीरात आपला सहभाग नोंदवावा या रक्तदान शिबिरात मुस्लिम बांधवांनी पण प्रामुख्याने सहभाग नोंदवावा होता. या रक्तदान शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती पण ९६ वी व रक्तदान पण ९६ व्यक्तीने केले.या रक्तदान शिबीरात लोहा कंधार युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष मा.शिवसेना नगरसेवक युवराज भाऊ वाघमारे , टायगर ग्रुपचे अध्यक्ष वैभव भैया हाके , आदिंची सहभाग नोंदवला.
या रक्तदान शिबिराला शिवसेना नेते अँड. मुक्तेश्वर धोंडगे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंडारकर , शिवशक्तीवाहतुक सेनेचे श्याम पा वानखेडे सेनेचे जि शिवसेना ता.संघटक गणेश कुंठेवार, ॲड मारोती पंढरे , उत्तम चव्हाण , नांदेड दक्षिणचे शिवसेना संघटक सुदाम पाटील बुद्रुक जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा प.स सदस्य नवनाथ बापु चव्हण ,प्राचार्य डाँ अशोक गवतेसर पुणे येथील सुप्रसिध्द उद्योजक भिमाशंकर मामा कापसे , विनोद गवते , दिपक रायफळे , डाँ संजय गुंडावार कंधार नगरसेवक संभाजी चव्हाण अमोल चव्हाण, कंधारचे बाळु पा.लुगारे,ता उपप्रमुख नागोराव सिरसाठ,दादाराव पा.दहिकळंबेकर,नागोरा पा.उमरेकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते तर हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी लोहा शिवसेना तालुकाप्रमुख हिलाल पाटील,शहरप्रमुख मिलिंद पा.पवार,किसानसेना तालुकाप्रमुख चंद्रकांत पा.आडगावकर,युवासेनेचे धनंजय पा.बोरगावकर अमर शेख (टेलर) गजानन कराडे संतोष येंडाळे अनेक शिवसेनीकांनी सहभाग नोंदवुन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.