दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
यानभुरे जयवंत सोपानराव
कंधार :- श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार ही संस्था शैक्षणिक क्षेत्रात मराठवाड्यात दुसऱ्या क्रमांकाची संस्था असून या संस्थे अंतर्गत चालणारे श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर नांदेड हि शाखा नांदेड शहराच्या उत्तरेकडील भागात मध्यवर्ती च्या ठिकाणी व गुणवत्तेच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेली शाखा होय याशाखे अंतर्गत कला , वाणिज्य , विज्ञान या तीनही शाखा चालतात या तीनही शाखेमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असून श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर नांदेड च्या वतीने 28 जानेवारी 2022 रोजी मराठी भाषा संवर्धन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे उपमुख्याध्यापक सुधीर भाऊ कुरुडे यांनी भूषविले.
तर प्रमुख पाहुणे म्हणून इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय नांदेडचे मराठी विभागाचे विभाग प्रमुख तथा साहित्यिक व कथाकार प्रा. शंकर विभुते तसेच कॉलेजचे उपप्राचार्य परशुराम येसलवाड व परीक्षा विभाग प्रमुख प्रा. मुरलीधर घोरबांड आणि ज्येष्ठ लेखिका , साहित्यीका तथा कवयित्री प्रा. स्वाती कान्हेगावकर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सुरुवात स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक परशुराम येसलवाड यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.स्वाती कान्हेगावकर यांनी दिला.
कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे प्रा. शंकर विभूते यांनी आपल्या मनोगतामधुन व कथाकथनातून विद्यार्थ्यांना लोटपोट हासवुन एका जागेवर खिळवून ठेवले आणि मनोगताच्या शेवटी माननीय गणप्या आमदार ही कथा सांगून कथेचा शेवट केला ही कथा ऐकत असताना विद्यार्थी अगदी आनंदी वातावरणात मंत्र मुग्ध होऊन हास्यकल्लोळात च्या सागरात बुडाले होते. अध्यक्षीय समारोपाच्या भाषणात शाळेचे उप मुख्याध्यापक सुधीर भाऊ कुरुडे यांनी मराठी भाषेचे महत्व , मराठी भाषेचा दर्जा , आणि मराठी भाषेचे भारतात व महाराष्ट्रात असलेले स्थान यावर प्रकाश टाकला, या कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. कैलास पतंगे यांच्या वतीने कॉलेजचे उपप्राचार्य परशुराम येसलवाड , पर्यवेक्षक माधव ब्याळे, परीक्षा विभाग प्रमुख प्रा मुरलीधर घोरबांड , सांस्कृतिक विभागप्रमुख स्वाती कान्हेगावकर यांच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक माधव ब्याळे यांनी केले असून कार्यक्रमाची सुरुवात वंदेमातरम या गीताने झाली तर समारोप प्रा .यानभुरे जयवंत सोपानराव यांनी ढोल-ताशाच्या तालासुरात राष्ट्रगीताने केली प्रसंगी प्रा. वसंत राठोड प्रा.अमर दहीवडे, प्रा. कपिल सोनकांबळे , प्रा. मोरेश्वर निलेश , प्रा. सोनटक्के शिवानंद , प्रा. विक्रम लुंगारे , प्रा. आर.डी.कळसकर ,प्रा. जामकर डी.बी. ,प्रा. जाधव पी.सी., प्रा.नवघरे आर.डी. , प्रा.डॉ. शेख आर.ए. , प्रा.दुल्हेवाड वैशाली , प्रा. पारेकर शिल्पा , श्री बालाजी निरपणे व श्री प्रशांत कुरुडे सर उपस्थित होते राष्ट्रगीताच्या पुर्वीआभार प्रा..कैलास पतंगे यांनी सर्व उपस्थितांचे व विद्यार्थ्यांचे आभार मांडले.