दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
केंद्रीय रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान
नांदेड :- लोहा तालुक्यातील मौजे पेनूरचे भूमीपुत्र व पुणे येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुनील शिंदे पेनूरकर यांनी सामाजिक व बांधकाम व्यावसायात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना मानवरत्न पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले असून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सुनील शिंदे पेनूरकर हे नेहमीच सामाजिक कार्यात सदा अग्रेसर राहतात. त्यांनी लोहा तालुक्यातील सावरगाव नसरत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यासाठी मोलाचे सहकार्य केले मोठी आर्थिक मदत केली.
तसेच लोहा तालुक्यातील अनेक गोरगरीब नागरिकांना, शेतकरी शेतमजूरांना ते सामाजिक बांधिलकी जोपासत नेहमी मदत करतात तसेच सामाजिक कार्य करीत असतांनाच आपल्या उद्योग व्यवसायात ही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे अनेक गोरगरीबांना, मध्यमवर्गीयांना त्यांचे स्वप्नांचे हक्काचे घर मिळावे म्हणून त्यांनी स्वराज्य होम कंपनीच्या वतीने अल्पदरात घरे उपलब्ध करून दिली.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटन संस्थेने घेऊन त्यांना दि.११ एप्रिल २०२२ रोजी मानवरत्न पुरस्कारांने एका शानदार कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कारांचे वितरण मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सतीश केदारी हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती व प्रमुख उपस्थिती हा मानाचा पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध उद्योजक सुनील शिंदे पेनूरकर यांना प्रदान करण्यात आला.