दै. चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
पेठवडज:- पद्मश्री कै. श्यामरावजी कदम यांचे पुण्यतिथी ते जयंती दरम्यानचे कालावधी निमित्ताने दरवर्षी ‘सहकार सप्ताह ‘साजरा करण्याचे मा. संचालक मंडळ सभेने ठरविले आहे. बॅकेच्या मा. संचालक मंडळाने ‘सहकार सप्ताहाचे ‘ औचित्य साधुन बॅकेच्या विविध शाखेत अनुदान वाटप, पिक कर्ज वाटपा दरम्यान होणाऱ्या गर्दीमुळे बॅकिंग व्यवहार करीत असताना खातेदारांना शाखेत बराच वेळ थांबावे लागत आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या खातेदारांना बँकींग व्यवहार करणे सुलभ व्हावे म्हणून ग्राहकांना ए. टी. एम. कार्ड वाटप करण्याचा व एस. एम. एस. सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. तरी बॅकेच्या सर्व खातेदारांनी आपल्या शाखेशी संपर्क साधुन आपले ए. टी. एम. कार्ड घेऊन आपला मोबाईल नंबर नोंद करून एस. एम. एस. या सुविधेचा लाभ घ्यावा असे दि.नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कळविले आहे. तरी पेठवडज सर्कल मधील सर्व खातेदारांनी याचा लाभ घ्यावा.