दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -मोहन आखाडे
पोलीस निरीक्षक गीता बागडे यांनी दिल्या तरुण-तरुणींना विनाकारण रस्त्यावर न थांबण्याचा सूचना
देवगिरी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा भरदिवसा गळा चिरून खून केल्याची धक्कादक घटना घडली. या घटनेनंतर उस्मानपुरा भागातील खाजगी क्लासेस मधील तरुण-तरुणी क्लासेस च्या नावाखाली टवाळखोरी करतात अश्या तरुण तरुणींना उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गीता बागडे पोलीस, उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांच्यासह पथकाने तरुण-तरुणींना चौकशी करत विनाकारण न थांबण्याच्या सूचना केल्या. तसेच क्लासेस चालक, हॉटेल व कॅफे चालकांना देखील सूचना केल्या.
दामिनी पथका मधे सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती सुषमा पवार मॅडम, आशा गायकवाड, एस पी खरात, रुपा साकला, मनिषा बनसोडे सर्व महीला दामिनी पथक यांनी सरस्वती भुवन काॅलेमधे जाऊन, प्राचार्य व शिक्षकांसोबत चर्चा केली. मुलांबरोबरच मुलींना ही विचारपुस चौकशी करण्यात आली, कोणाला काही समस्या असल्यास आपण 0240-2240500या नंबर तसेच डायल 112 या नंबर वरही आपण संपर्क करु शकता असे आवाहन सर्व, महीला मंडळी, मुली यांना करण्यात आले..