दैनिक चालू वार्ता
धुळे प्रतिनिधि
सोपान देसले
धुळे
धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष श्री. बाबासाहेब कुणालजी पाटील यांच्या प्रयत्नांतून धुळे तालुक्यातील नवलनगर-नावरा नावरी-सातरणे-मोहाडी या १० किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी तब्बल ४ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. आज दिनांक १९ ऑक्टोबर २०२१ रोजी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. लवकरच हा रस्ता पूर्णत्वास जाऊन पंचक्रोशीच्या विकासात मोलाची भर पडणार आहे. आदरणीय दाजीसाहेब यांच्या आशीर्वादाने व आदरणीय बाबासाहेबांच्या कामाच्या झपाट्याने धुळे तालुक्याचा कायापालट होत असून तालुक्यातील समस्त जनता या प्रगतीच्या लाटेने आनंदीत आहे.
जि प सदस्य किरण पाटील ,दरबारसिग गिरासे के टी पाटील आदि मान्यवर उपस्थित होते