दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज मंगळवार, दिनांक १९ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता विद्या व्हॅली ग्लोबल स्कुल, आरटीओ कार्यालयासमोर, अंबाजोगाई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत संघटनात्मक पातळीवर आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणूका आणि जिल्ह्यात काँग्रेस पक्ष बांधणी व बळकटी संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. तरी या बैठकीस जिल्हा काँग्रेस कमेटीचे सर्व पदाधिकारी, विविध सेलचे अध्यक्ष यांनी उपस्थित रहावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केले आहे. जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख म्हणाले की, मंगळवार दि. ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता विद्या व्हॅली ग्लोबल स्कुल, आरटीओ कार्यालयासमोर, अंबाजोगाई येथे बीड जिल्ह्यातील काँग्रेस कमिटी अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत जिल्हा कमेटीच्या पदाधिकाऱ्यांसह विविध सेलचे अध्यक्ष यांच्याशी थेट संवाद साधण्यात येणार आहे. याप्रसंगी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांची उपस्थिती व मार्गदर्शन आहे. या माध्यमातून बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे