दैनिक चालू वार्ता
पालघर मोखाडा
अनंता टोपले
मोखाडा-डोंबविली येथील के सी गांधी शाळेचे अमोल पाटील यांनी जिल्हा परिषद शाळा वाकडपाडा व वाकडपाडा हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना आकाशकंदील बनविण्याचे मोफत प्रशिक्षण दि २४ आक्टोबर वार रविवार रोजी वाकडपाडा येथे दिले.पाटील यांनी स्वखर्चाने साहित्य घेऊन मुलांना मोफत मार्गदर्शन केल्यामुळे त्यांचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. त्यांच्या सोबत शेखर पाटील,देवीदास गवारी,योगेश खोरगडे यांनी देखील सहभाग घेतला.यावेळी पंचायत समिती सदस्य प्रदीप वाघप् यांनी मार्गदर्शक शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. या सामाजिक कामाचे संजय वाघ यांनी सर्व व्यवस्था पाहीली आहे.यावेळी माजी सरपंच मंगेश दाते, विठ्ठल गोडे,रमेश बोटे,अशोक वाघ,निलेश गवारी,हर्षदा खादे व ग्रामस्थ उपस्थित होते.