दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भू म:- स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त भूम शहरामध्ये सर्व शासकीय,निमशासकीय कार्यालयासह, महाविद्यालयात,शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण मोठ्या उत्साहात करण्यात आले. शहरातून सर्व महाविद्यालय,शाळा यांच्या वतीने प्रभात फेरी गोलाई चौक, ओंकार चौक, गांधी चौक ,नगरपालिका ,रवींद्र शाळा, शंकरराव पाटील महाविद्यालय या ठिकाणाहून उत्साहात पार पडली. सार्वजनिक संस्थेमध्ये प्रशासक असल्यामुळे प्रशासकांना झेंडा फडकवण्याचा मान मिळाला. त्यामध्ये नगरपरिषद प्रशासक तानाजी चव्हाण, पंचायत समिती गट विकास अधिकारी ढवळशांक, भूम तहसील कार्यालय तहसीलदार उषाकिरण शृंगारे, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, नगरसेवक संजय पवार ,संजय साबळे , मुसीर शेख, सुरज गाढवे, राकेश जाधव, बालाजी अंधारे, आदम शेख,बाळासाहेब क्षिरसागर, दिनेश पोरे, नगर अभियंता गणेश जगदाळे, पत्रकार आबासाहेब बोराडे, वसीम काजळेकर, अब्बास सय्यद, राम वारे सामजिक कार्यकर्ते, नगरसेवक, शिक्षक, पालक, विद्यार्थी, विधी तज्ञ ,पत्रकार बांधव यांची उपस्थिती होती.