दैनिक चालू वार्ता पूणे शहर प्रतिनिधी -विशाल खुणे
केसनंद दिनांक 15 ऑगस्ट 2022
75 व्या स्वातंत्र्य दिन शार्प एज इंटरनॅशनल स्कूल केसनंद पुणे दिमाखात साजरा झाला यावेळेस कार्यक्रमाचे आयोजक चेअरमन संदीप हरगुडे सर प्राचार्य माननीय सीमा हरगुडे मॅडम यांनी यावेळेस विशेष करून पुणे जिल्ह्यामध्ये हजारो मुला-मुलींना कराटेचे विशेष प्रात्यक्षिक आणि मुलींसाठी एक सेल्फ डिफेन्स शिकवण्याचं काम करणारे शोटोकोन कराटे ड्यू स्पोर्टस् असोसिएशन पुणे याचे चेअरमन अमित कुमार ठाकूर सर यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलविले होते आणि त्यांच्या हस्ते तिरंग्याचे ध्वजारोहण करण्यात आले. शाळेमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त असे विद्यार्थ्यांचे आणि खेळाडू विद्यार्थ्यांचे सरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.